Dr. Nanasaheb Jadhav ; समाजकार्याचा विद्यार्थी हा सामाजिक अभियंता आहे – कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव
नवीन नांदेड l श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको, नवीन नांदेडच्या वतीने आयोजित केलेल्या बीएसडब्ल्यू प्रथम वर्ष व एम.एस.डब्ल्यू. प्रथम वर्षाच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्बोधन करताना डॉ. कर्मयोगी नानासाहेब जाधव यांनी केले.
प्रमुख उपस्थितीत सौ.शांतादेवी जाधव संस्थेच्या उपाध्यक्ष ह्या होत्या. तसेच कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव पुढे म्हणाले की समाजकार्य हा अभ्यासक्रम जगाच्या पाठीवर सर्वत्र आहे. समाजकार्य पदवीचे विद्यार्थी समाजाला जोडण्याचे काम करतात. आपण ग्रामीण भागातील जीवन शैलीचा अभ्यास करावा. जगातील देशाचा अभ्यास करून आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो याचा विचार समाज कार्याच्या विद्यार्थ्यांनी करावा.
भारतासारखे जीवन जगामध्ये समाधानकारक कुठेही नाही, महाविद्यालयाच्या ग्रंथा...
