Wednesday, May 13

Tag: A Mother’s Hard Work Bears Fruit

Son Becomes Police : आईच्या कष्टाच चीज; मुलगा पोलिस बनला

Son Becomes Police : आईच्या कष्टाच चीज; मुलगा पोलिस बनला

करियर, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | “कष्टाचं फळ गोड असतं” या म्हणीचा प्रत्यय हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील रोहित बिच्चेवार यांच्या यशातून पुन्हा एकदा आला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आईच्या कष्टांवर वाढलेला मुलगा आज पोलिस दलात दाखल झाला असून संपूर्ण परिसरात त्याचं कौतुक होत आहे. रोहित संदिप बिच्चेवार यांचे वडील त्याच्या अवघ्या पाचव्या वर्षीच वारले. घराची सर्व जबाबदारी आई वनिताबाई यांच्या खांद्यावर आली. लहान दोन मुलांना सांभाळत त्यांनी रोजमजुरी करून कुटुंब चालवलं. अक्षरशः विळ्याच्या आणीवर दिवस काढत मुलांचं संगोपन आणि शिक्षण पूर्ण केलं. रोहितचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सरसम येथे, तर दहावीपर्यंतचं शिक्षण देशमुख विद्यालयात पूर्ण झालं. पुढे हिमायतनगर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्याने पोलिस भरतीची तयारी सुरू केली. आर्थिक परिस्थितीमुळे महागड्या क्लासेस किंवा अकॅडमीचा ...
error: Content is protected !!