Sunday, May 31

Tag: a hunger striker on the steps

Bathing by hunger stricke : कृषी कार्यालयाच्या पायरीवर उपोषणकर्त्यास आंघोळ घालून मनमानी कारभाराचा निषेध

Bathing by hunger stricke : कृषी कार्यालयाच्या पायरीवर उपोषणकर्त्यास आंघोळ घालून मनमानी कारभाराचा निषेध

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा (बु.) येथील शेतकऱ्यांचे रखडलेले पशुधन खरेदीचे देयक तातडीने द्यावे, या मागणीसाठी कृषी विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आज आक्रमक वळण लागले. प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी थेट कृषी कार्यालयाच्या पायरीवरच प्रमुख उपोषणकर्ते संतोष फुलेवार यांना आंघोळ घालून निषेध नोंदवला. गेल्या चार दिवसांपासून हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर 45 शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र “गेंड्याची कातडी पांघरलेल्या अधिकाऱ्यांकडून” शेतकऱ्यांच्या मानधनाबाबत चालढकल सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. रखडलेली पशुधन खरेदीची देयके तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करावीत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी देयक प्रक्रियेत कथित हेराफेरीच...
error: Content is protected !!