Chief Minister’s Women’s Empowerment Campaign ; मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानात गुरुवारी नांदेड येथे भव्य महिलांचा महामेळावा – NNL
नांदेड | महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसह अनेक पथदर्शी योजना आणल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीतून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. या योजनातील लाभार्थी महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी 10 ऑक्टोबरला नांदेड येथे भव्य महिला मेळावा होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी 10 ऑक्टोबर 2024 रोजी नांदेड येथे महिला सशक्तिकरण अभियानाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. नांदेड येथील नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भव्य होणाऱ्या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण, मा. बाळास...
