Akhil Bharatiya Marathi Press Council ; अ. भा. मराठी पत्रकार परिषद यावर्षी पासून समाजसेवेसाठी पुरस्कार देणार
मुंबई l अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेत देदीप्यमान कामगिरी करणारया पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते.. यावर्षी पासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारया व्यक्तींना "लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक -शैक्षणिक सेवा गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
51,111 रूपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.. रामशेठ ठाकूर यांनी परिषदेकडे ठेवलेल्या ठेवीतून हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे ..फेब्रुवारी 2026 मध्ये यंदाचे पुरस्कार दिले जातील.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडे विविध मान्यवरांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून दरवर्षी 10 पत्रकारांचा गौरव केला जातो.. यामध्ये परिषद स्वतःच्या निध...
