76th Republic Day : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय समारंभ
मुंबई| भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा (76th Republic Day) मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील.
ठाणे - उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, पुणे - उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार, नागपूर - मंत्री सर्वश...
