25 yoga camps completed : नांदेड जिल्हा व तहसील तसेच ग्राम स्तरावर 25 योग शिबिर संपन्न
नांदेड| जिल्हाभर 1 जून पर्यंत पतंजली योग परिवार नांदेड तर्फे 201 योग शिबिराचे नियोजन होत आहे. आतापर्यंत नांदेड जिल्हा व तहसील तसेच ग्राम स्तरावर 25 योग शिबिर संपन्न झाली (25 yoga camps completed). या अनुषंगाने काबरा नगर श्रीकृष्ण मंदिर ठिकाणी वरील शिबिरात मार्गदर्शन केलेल्या योग शिक्षकांचा पतंजली योग समिती नांदेड तर्फे सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी राम शिवपनोर, दत्तात्रय काळे, सविता गवाळे,अनिल अमृतवार यांनी मार्गदर्शन केले. महारुद्र माळगे यांनी सूत्रसंचालन केले तर पंडित पाटील यांनी आभार व्यक्त केला. अनिल अमृतवार म्हणाले जर घरोघरी योग पोहोचवायचा असेल, श्रद्धेय स्वामी रामदेव जी महाराज यांचे स्वप्न साकार करावयाचे असेल तर "जागा तेथे योग" शिबिरे लावणे. "नियमित योग वर्ग" वाढवणे व "योग शिक्षण प्रशिक्षणाद्वारे" योगशिक्षक निर्माण करणे, गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी सर्वश्री आदरणीय पं...
