22 stolen bicycles seized : भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी; २२ चोरीच्या सायकली जप्त, आरोपी अटकेत
नांदेड | भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने प्रभावी कारवाई करत एका आरोपीकडून चोरीच्या २२ सायकली (अंदाजे किंमत २ लाख ३७ हजार रुपये) जप्त केल्या असून संबंधित आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. याप्रकरणी गु.र.नं. ६६०/२०२५, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.१६ वाजता हा गुन्हा उघडकीस आला असून, २३ डिसेंबर २०२५ रोजी अहवाल दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी वाहन व सायकल चोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला.
गोपनीय माहितीच्या आधारे कल्याणनगर, नांदेड येथे संशयित माधव गणपत मारे (वय ४५, रा. कल...
