अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे वाहनासह 1,35,65,000/- रुपयाचा मुद्येमाल जप्त 12 आरोपी ताब्यात -NNL
नांदेड। अवैध्य रित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे वाहनावार कायदेशिर कडक कार्यवाही करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार दिनांक 11/06/2024 रोजी उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील 1) सपोनि / संतोष शेकडे, 2) पोउपनि/मिलींद सोनकांबळे 3) पोउपनि / साईनाथ पुयड यांचेसोबत पोलीस अमंलदार देवुन वेगवेगळी तीन पथके नेमुन अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे वाहना कार्यवाही करण्याबाबत सक्त सुचना दिल्या होत्या.
त्यावरून दिनांक 12/06/2024 रोजी स्थागुशाचे सपोनि / संतोष शेकडे, पोउपनि / मिलींद सोनकांबळे, पोउपनि / साईनाथ पुयड यांचे पथकाने पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, विमानतळ, वजीराबाद हद्दीत पेट्रोलींग दरम्यान मौजे भनगी येथील गोदावरी नदीपात्रातुन अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे ...
