Lcb action ; नांदेड जिल्हायात जनावर चोरी करणारी टोळी गजाआढ ! एक अरोपी सह 2,13,000 रुपयाचा मुदेमाल जप्त -NNL
नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे ऑपरेशन फ्लश आउट नुसार मागील विविध गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. त्यानुसार नांदेड जिल्हायात जनावर चोरी करणारी टोळी गजाआढ करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक अरोपीसह 2 लक्ष 13 हजार रुपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 28/09/2024 रोजी स्थागुशा चे पोउपनि मिंलीद सोनकांबळे यांच्या पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, देगलुर नाका टायर बर्बोड कमान जवळ एक इसम हा जनावर चोरी करातो अशी खात्रीशील माहिती मिळाल्याने स्थागुशाचे पथकांने मिळालेल्या माहितीचे ठिकाणी जावुन गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहिती प्र...
