नांदेड (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांच्या स्वरमेघ म्युझिक कल्चरच्या वतीने रविवार, दि. 5 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता नांदेड येथे “तेरे सुर और मेरे गीत” या सदाबहार संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. येथील गायिका मेघा संजीवन यांच्यासह इंडियन आयडॉल आणि सारेगमप फेम स्टार गिटारिस्ट रॉनी सातमकर आणि प्रसिद्ध गायक चँग हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहेत.


या प्रसिद्ध गायकांसह “दैनिक गोदातीर समाचार”चे संपादक तथा गायक केशव घोणसे पाटील, प्रसिद्ध गायक मंजूर हाश्मी, विजय बंडेवार, डॉ. हंसराज वैद्य, डॉ. सिद्धार्थ एम. जोंधळे, सावजी दुमाने हेही नव्या- जुन्या दमाची विविध गीते सादर करणार आहेत.



स्पेशल गिटारिस्ट रॉनी सातमकर हे प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्यासह विविध गायकांना साथ संगीत देणारे गिटारिस्ट असून त्यांचे गिटार वादन नांदेडकरांसाठी आगळीवेगळी संगीत मेजवानी ठरणार आहे. प्रतिभावान गायक चँग हेही विविध प्रसिद्ध गायकांच्या आवाजात गायलेली गीते सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी देशातील विविध शहरांसह विदेशातही अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण केलेले आहे. यासह नांदेडच्या प्रसिद्ध गायिका मेघा संजीवन याही सूरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासह विविध गायिकांची गीते सादर करणाऱ्या सुरेल आवाजाच्या गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत.



रविवार, दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम जवळ, नांदेड येथे हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम नि:शुल्क असून कार्यक्रमासाठी नि:शुल्क प्रवेशिकांद्वारे प्रवेश देण्यात येणार आहे. मोफत प्रवेशिका मिळविण्यासाठी रसिक- श्रोत्यांनी, संजीवन गायकवाड (मोबाईल क्रमांक 9422892161, 7972424915) आणि केशव घोणसे पाटील (मोबाईल क्रमांक – 94221717777) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन निर्मात्या आणि प्रमुख गायिका मेघा संजीवन यांनी केले आहे.



