नांदेड,अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका आहे. या भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी व शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी सकाळी ८ वा. शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली व शेतकरी बांधवांना धीर दिला.
हदगाव तालुक्यातील उंचाडा या गावातील नुकसानीची सरकारने तात्काळ भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. पुढील ४ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी, अशी मागणी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली.
नांदेड मधील दौऱ्यानंतर छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी व इतर घटक पक्ष परभणी भागातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करणार आहेत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत आणि सरकारने सरसकट भरीव मदत करावी, अशी मागणी यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
यावेळी स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष माधव पाटील देवसरकर, सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम, सदा पाटील पुयड, मंगेश पाटील कदम, माधवराव पाटील गजानन पाटील सोळंके,तिरुपती पाटील भगनुरे , बालाजी पाटील कराळे, अवधूत पाटील पवार, पवन पाटील मोरे, अमोल पाटील मारलेगावकर मुन्ना पाटील शिंदे, कृष्णा पाटील हडपकर, अवधूत वानखेडे, आकाश गोडले, निरंजन कदम, शिवा पाटील शिंदे, राहुल लांडगे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.