नांदेड। यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील बारा वर्षे वयाचा रुग्ण श्रेयश रविकांत कांबळे या मुलावर व्हॅस्क्युलर वेन्स मॉलफॉर्मेशन या गंभीर आजारावर यशस्वीरित्या उपचार करण्यात यशोदा हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर भावीन राम व डॉक्टर प्रभाकर डी आणि त्यांच्या टीमला यश आले आहे.


याविषयी अधिक माहिती अशी की नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील व्हॅस्क्युलर वेन्स मॉलफॉर्मेशन या आजाराचा रुग्ण असलेल्या श्रेयस कांबळे या मुलाला धावताना, चालताना ,बसताना , उठताना प्रचंड वेदना होत होत्या त्याला त्या आजाराचा त्रास मागील तीन ते चार वर्षापासून होता तो त्रास दिवसेंदिवस वाढतच जात होता.


या आजारावर उपचारासाठी त्याने नांदेड येथील यशोसाई हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर देवेंद्र पालीवाल यांच्याकडे संपर्क साधला त्यावेळी प्राथमिक तपासण्यानंतर डॉक्टर पालीवाल यांच्या लक्षात आले की हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून व्हॅस्क्युलर वेन्स मॉलफॉर्मेशन या आजारामध्ये रुग्णाच्या पर्टिक्युलर भागामध्ये रक्तपुरवठा करणारा रक्तवाहिनांची अनावश्यक रित्या वाढ होऊन त्या भागात रक्तपुरवठा करण्यास रक्तवाहिन्यांना अडथळा निर्माण होतो प्रसंगी त्या रक्तवाहिन्या फुटून मोठी गंभीर इजा रुग्णास होऊ शकते ही बाब ओळखून त्यांनी रुग्णास पुढील उपचारासाठी सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल येथे पाठविले.


व्हॅस्क्युलर वेन्स मॉलफॉर्मेशनचा रुग्ण असलेल्या श्रेयश कांबळे यास नातेवाईकांनी सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तेथील आर्थोपेडिक विभागातील डॉक्टर देवेंद्र यांनी रुग्णाला व्हॅस्क्युलर विभागातील डॉ. भावीन राम यांच्यकडे रेफर केले त्यांनी वेदनेची तीव्रता व विकृतीचा मोठा आकार लक्षात घेता एक एकाच वेळी अनेक तज्ञांची आवश्यकता असल्याचे डॉक्टराना लक्षात आले.

त्यानुसार पुढील सर्जरीसाठी नियोजन करताना प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. श्रीनिवास जमुला यांच्या सहकार्याने व्हस्क्युलर व्हेन्स् शस्त्रक्रिया विभागातील डॉ. भावीन राम व डॉ. प्रभाकर डी यांच्या नेतृत्वाखालील कुशल पथकाने ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली संपूर्ण डॉक्टरांच्या टीमने एकत्रित कौशल्याने व्हॅस्क्युलर वेन्स मॉलफॉर्मेशन या आजारावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून वाढलेल्या रक्तवाहिन्या काढून टाकत रुग्णाला होत असलेल्या प्रचंड वेदनेपासून आराम तेही अत्यंत कमी वेळेत त्यांनी मिळवून दिला आहे.
शस्त्रक्रियेवर अनुभव व्यक्त करताना रुग्ण श्रेयस रविकांत कांबळे यांनी सांगितले की तो शस्त्रक्रियेच्या तीन महिन्यानंतर पूर्णपणे सामान्य असून कोणत्याही अडचणी शिवाय चालू व धावू शकत आहे. रक्त वाहीन्यांच्या जटील आजारांसदर्भातील रक्तवाहीन्यांची अनावश्यक वाढ होणे आजार हा मुख्यतः जन्मजात असतो आणि या आजारात रुग्णास तिव्र वेदना, सुज आणि प्रसंगी गंभीर रक्तस्त्राव होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारच्या आजारावर रक्तवाहीन्यांच्या् संबधीत तज्ञ डॉक्टरांकडून योग्य ते उपचार करावेत असे आवाहन डॉ.भाविन राम यांनी केले. यशोदा हॉस्पिटल येथे गंभीर रुंग्णावर अंतत्य कौशल्यपूर्णरित्या आणि जटील परिस्थितीत यशस्वी उपचार केले जातात हे त्याचे उत्तम उदाहरण आहे ..
व्हेन्स् मालफॉरमेशन म्हणजेच रक्तवाहीन्यांची असामान्य वाढ
सामान्य, गुळगुळीत नळीसारख्या वाहिन्या तयार करण्याऐवजी, वाहिन्या खिशात, अतिरिक्त वाहिन्या किंवा अगदी शंटिंग वेसल्समध्ये बनतात (धमनी विकृती/फिस्टुलेच्या बाबतीत). रक्त किंवा लिम्फ येथे असामान्यपणे गोळा करू शकतात. यामुळे सूज, संसर्ग आणि वेदना होऊ शकतात.

अधूनमधून वेदना (क्लॉडिकेशन), ज्यात पेटके, स्नायू थकवा किंवा जडपणा (सामान्यतः पायांमध्ये) व्यायामादरम्यान तीव्र वेदना (सामान्यतः पायांमध्ये) विश्रांती दरम्यान वेदना कमी होणे (सामान्यतः पायांमध्ये) प्रभावित शरीराच्या भागाची थंडी वाजून येणे ही लक्षण असतात अशी माहीती रक्तवाहीन्यांचे आजार तज्ञ डॉ. भाविन राम यांनी यावेळी दिली .


