नवीन नांदेड l श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्था,विष्णुपुरी, नांदेड येथील बी.टेक.स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत द्वितीय वर्षात शिकत असलेला विद्यार्थी सत्यजीत चंद्रकांतराव दामेकर यांने “Entreprethon 2025” या प्रतिष्ठित उद्योजकता विकास स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.


नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या (SRTMU), वतीने Innovation, Incubation & Linkage (नवोपक्रम, उद्योजकता व संलग्नता) विभाग आणि School of Commerce & Management Sciences यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ मार्च २०२५ रोजी खुल्या स्वरूपात पदवीपूर्व व पदव्युत्तर गटामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


पदवीपूर्व स्तरावरील स्पर्धेत श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्था विष्णुपुरी ,नांदेड येथील बी.टेक.स्थापत्य अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी सत्यजीत चंद्रकांतराव दामेकर हा प्रथम पारितोषीकाचा मानकरी ठरला आहे.

सत्यजीत यांनी “नंदिग्राम आरोग्य यात्रा (NAYA)” हा अभिनव स्टार्टअप मॉडेल सादर करून नांदेडला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट उपाय योजना सुचविल्या आहेत. त्याच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेला परीक्षकांकडून उल्लेखनीय प्रशंसा मिळाली असून त्याला ₹3,000 रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच, ₹1 लाखाच्या स्टार्टअप फंडिंगसाठी त्याने पात्रता मिळवली आहे.

सत्यजीतला या उल्लेखनीय यशासाठी संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे, उद्योजकता विकास कक्षाचे (Entrepreneurship Cell) समन्वयक व नवोपक्रम, उद्योजकता व संलग्नता अधिष्ठाता (Dean Innovation, Incubation & Linkage) डॉ. जयश्री वाघमारे, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता (Dean Student Affairs) प्रा.संजय देठे, तसेच स्थापत्य अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर भगत यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ मिळाले आहे.
त्याच्या कठोर परिश्रम, चिकाटी आणि उद्योजकतेच्या उत्कटतेमुळे संस्थेचा नावलौकिक उंचावला आहे. हे यश SGGSIE&T परिवारासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, त्याने संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
सत्यजीत चंद्रकांतराव दामेकर च्या “Entreprethon 2025” मधील यशा बद्दल एस. जी. जी. एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, विष्णुपुरी, नांदेड चे नियमक मंडळाचे अध्यक्ष श्री सुनील जी रायठठ्ठा, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई चे संचालक तथा नियामक मंडळाचे मा. सदस्य डॉ.विनोद मोहीतकर, प्रा.डॉ विक्रम गद्रे,सौ.राजश्रीताई पाटील,श्री निखिलजी मुंडले,श्री प्रशांत पौळ,श्री आशुतोष डुमरे,श्री बाबा सुखविंदर सिंघजी, डॉ.डी.डी.डोये,व डॉ.जे.व्हि. मेघा, संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे, सर्व अधिष्ठाता व विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.