नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील राहेगाव येथील पुलावर गोदावरी नदीच्या देवापूर बंधाराचा बाक्य वाॅटर मुळे आलेल्या पुरामूळे आठेचाळीस तासांपासून गावकऱ्यांचा संपर्क तुटल्यामुळे या ठिकाणी नांदेड उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ व नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी19 ऑगस्ट रोजी भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले.


नांदेड येथील गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे देवापुर बंधाराचा बाक वाॅटर मुळे राहेगाव येथील गावकऱ्यांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला होता, किक्की येथुन गावकरी यांना जाणे येणे होत नव्हते,अखेर सरपंच विलास पाटील इंगळे व पोलीस पाटील प्रतिनिधी संजय पाटील इंगळे यांनी महसूल प्रशासनानाशी संपर्क साधुन आवश्यक ती मदत करण्याची मागणी केली होती.


नांदेड उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ व नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी संबंधित स्थळी भेट देऊन पाहणी केली व आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी सरपंच विलास पाटील इंगळे यांच्या सह मंडळ अधिकारी बडवणे, तलाठी गौतम पांढरे, ग्रामसेवक भारती यांच्या सह पोलीस पाटील प्रतिनिधी संजय इंगळे व पोलीस पाटील गोविंद तेलंगे, विजयकुमार खटके,वसंत पल्लेवाड, व ग्रामस्थ उपस्थित होते.




