हिमायतनगर (अनिल मादसवार) नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामुळे झाडांवर टांगलेली चिमणी पाखरांची घरटी उध्वस्त झाली. पिलांसाठी सुरक्षितता व खाद्य-पाण्याची सोय म्हणून चिमण्या पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात घरटी (खोपा) बांधतात.


मात्र, निसर्गाच्या या चक्रव्यूहात केवळ दहा दिवसांचेच आयुष्य या पिलांना लाभले काय..? असा हृदयस्पर्शी प्रश्न चिमणीप्रेमी व पक्षीसंवर्धन कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे.



वादळी वाऱ्यामुळे उध्वस्त झालेली घरटी पाहून पक्षीप्रेमींच्या डोळ्यात चिंता व दु:ख उमटले असून, भविष्यात अशा नाजूक जीवांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.




