नवीन नांदेड| क्रीडा दिनानिमित्ताने नांदेड जिल्हा खो-खो असोसिएशन तर्फे क्रीडा दिन साजरा करण्यात आला, यावेळी क्रिडा खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गोपिले, प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे ,तालुका क्रीडा अधिकारी बेतेवार ,तालुका क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर ,विनोद कांचनगिरे संतोष कांचनगिरे डॉ.राहुल वाघमारे ,विनोद जमदाडे ,सूर्यवंशी, नागराज ,प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी टेंबरे विद्यार्थ्यांना भविष्यकाळात राज्य व राष्ट्रीय खेळाडू घडावे व नोकरीसाठी प्रयत्न करावेत आणि मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना माहिती दिली हॉकीचे जादूगार म्हणजे ध्यानचंद यांची प्रेरणा घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत सिडको हडकोतील खेळाडू गेले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली .
नांदेड जिल्ह्याचे खो-खो असोसिएशनचे सचिव प्रा.डॉ.रमेश नांदेडकर रवी सावळे ,बजू सावळे विठ्ठल मरवाळे,आकाश देठाने ,संभाजी जाधव मामा ,इत्यादींनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर खो-खो खेळाडू क्रीडाप्रेमी जवळपास 80ते90 खेळाडू उपस्थित होते .हा कार्यक्रम 29 ऑगस्ट रात्री नऊ वाजता खो-खोच्या मैदानावर घेण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. रमेश नांदेडकर यांच्या सह अनेकांच्या क्रिडादिना निमित्ताने सत्कार करण्यात आला.