हदगाव/तामसा| नव्यानेच झालेल्या नांदेड-तामसा महामार्गावर भरधाव वेगातील कारावरील चालकांचा ताबा सुटल्याने पिंपराळा येथील पानटपरीवर मंगळवार दिनांक ०६ रोजी दुपारी ०२ वाजेच्या सुमारास आदळली. या घडलेल्या कार अपघाताच्या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तामसा तांडा येथील गंगाधर कैलास राठोड वय २२ वर्ष आणि कबीर दिलीप चव्हाण वय २४ वर्ष हे दोघे मित्र मंगळवारी दिनांक ०६ रोजी एम एच ४६ डब्ल्यू- ०५४७ या कारमधून नांदेडकडे जात असताना, भरधाव वेगात असलेल्या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने ही कार पिंपराळा गावातील महामार्ग लगत असलेल्या पानटपरीवर आदळली. या अपघातात कारमधील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला.


कारचा अपघात झाल्याचे समजल्यानंतर घटनास्थळी पोलिस पोहोचल्यानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने पानटपरी आणि कार आदळल्या गेलेल्या टेबलावर कुणीहि बसून नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत कारचा समोरील भाग चक्काचूर झाला असून पानटपरी आणि येथे बसण्यासाठी लावलेली टेबलाही तुटून गेली आहेत. तामसा पोलिस थानायचे सहायक पोलिस निरीक्षक कमल शिंदे, पोलिस उपनिरीक्षक डुडुळे यांच्यासह सूर्यवंशी, नागरगोजे आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या अपघातातील युवकांच्या नातेवाइकांशी संपर्क करून मयत युवकांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठले होते.
