हिमायतनगर| तालुक्यातील मौजे हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी अंतर्गत रस्त्याचे काम रखडल्याने या भागातील प्रवाशी नागरीकांना जिवघेना प्रवास करावा लागत आहे. प्रवाश्यांची, शालेय विद्यार्थ्याची होणारी परवड थांबत नसल्याने पळसपूर येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे यांनी स्वतः व इतर प्रवाशी व भागातील दानशूर व्यक्तींकडून वर्गणीच्या रूपाने रक्कम जमा करून टॅकटरच्या साह्याने मुरूम टाकल्याने हा अंतर्गत रस्ता काहीं प्रमाणात रहदारीसाठी सुरळीत झाला आहे. प्रवाशी नागरिकांची होणारी परवड आता थांबली असली तरी कायम रस्त्याचा प्रश्न सुटावा अशी मागणी त्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्याची डागडुजी झाल्याने महामंडळ बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, गांजेगाव मार्गे विदर्भाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम हिंगोलीचे माजी खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले. कोट्यावधी रूपयांचा विकास निधी मंजूर झाल्यानंतर संभाजीनगर येथील सिद्दीकी नामक ठेकेदारास हे काम देण्यात आले. सुरूवातीला खोदकाम करून मजबुतीकरण करण्यात आले. मात्र त्यावर नुसती सोलींग अंथरून टाकण्यात आल्याने अनेक वाहने दुचाकी स्लिप होऊन कोसळून अपघातग्रस्त होत आहेत. अश्याच अवस्थेत दोन वर्षांपासून हे काम थांबून आहे. सोलींग, गिट्टी उघडी पडली असल्याने प्रवाशांना या रस्त्यावरून येजा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या भागातील नागरीकांनी ह्या रस्त्याचे काम वेगाने पुर्ण करावे, म्हणून अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलने केली. साखळी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ठेकेदारांनी हिमायतनगर कडून कामाला सुरुवात केली. दोन फर्लाग काम गिट्टी अंथरणे झाल्यावर ठेकेदाराने पुन्हा अर्धवट काम ठेऊन पलायन केले आहे. आजघडीला हा रस्ता मौत का कुआ बनला असून, प्रवाश्यांचे मोठ्याप्रमाणात हाल होत असून, या रत्स्याच्या काटकटीपासून कधी मुक्ती मिळेल याकडे सिरपल्ली, डोल्हारी, पळसपूर, गंजेगाव, ढाणकी येथील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
असे असतानाच, दिवाळी मुळे प्रवाशी संख्या वाढली आहे. दरम्यान ये – जा करताना प्रवाश्यांची हेळसांड थांबवण्यासाठी पळसपूर येथील विठ्ठलराव गायकवाड,नागोराव शिंदे यांनी पुढाकार घेऊन, लोक वर्गणीच्या माध्यमातून या अंतर्गत रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मुरुम अंथरला असल्याने हा अंतर्गत रस्ता तात्पुरता सुरळीत झाला आहे. मात्र या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेऊन पंचक्रोशी तीळ नागरिकांचे हाल होणार नाही याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मात प्रवाशी नागरिक व्यक्त करत आहेत.