भोकर l सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. ठीक ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. तसेच उप जिल्हा रुग्णालयाचे बाजूला नविन बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी सुद्धा डास उत्पत्ती ठिकाणे वाढ झाली आहे. त्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होत आहे. ग्रामीण रुग्णालय भोकर अंतर्गत रुग्ण कल्याण समिती द्वारे रुग्णाच्या सोय, सुविधा करिता डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक यांनी नांदेड येथून जिल्हा हिवताप कार्यालय येथील धूर फवारणी मशीन मागविण्यात आले.



ग्रामीण रुग्णालय भोकर संपूर्ण परिसर, उप जिल्हा रुग्णालय नविन बांधकाम ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली. जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथील विठ्ठल गवळी, अक्षय निमकर, मोळके मामा, वाहन चालक मुकुंद देवकांबळे, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील दिनेश लोट, करण शिंदे, सोहेल, रवि वाटोरे, पवार,सेवक,ओम साई शिंदे,संदीप सुरक्षा रक्षक आदी कर्मचारी उपस्थित होते.




