किनवट, परमेश्वर पेशवे| एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सहस्त्रकुंड च्या सिद्धांत दत्ता लोखंडे इयत्ता दहावी व पूजा केशव बेले इयत्ता नववी यांनी नुकत्याच दिनांक १० नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान ओरिसा भुनेश्वर येथे आयोजित इ एम आर एस. राष्ट्रीय कला उत्सव 2024 मध्ये पारंपारिक कथा कथन या कला प्रकारात देशपातळीवरील प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
अथक परिश्रम आणि एकलव्य विद्यालयासाठी सतत धडपडणाऱ्या प्राचार्य श्रीमती राधिका गोलटकर व सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनात आणि कर्मचारी वृंदाच्या संयुगांनी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल सहस्त्रकुंड चे चार विद्यार्थी नाशिक येथील राज्यकल्ला उत्सवात प्रथम क्रमांकावर येऊन महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत ओरिसा भुनेश्वर येथील राष्ट्रीय कला उत्सव 2024 मध्ये सहभागी झाले होते, बडा पेन नावाची पारंपारिक कथा पूजा आणि सिद्धांत यांनी या कला उत्सवात सादर केली होती.
हीच कथा इतर राज्यांना टक्कर देत प्रथम राहिली विद्यालय प्राचार्य श्रीमती राधिका गोलटकर आणि विद्यालय अध्यापक बरीरा मताशा, प्रिन्समान बालाजी कनाके, माधव ढोले, संगीत अध्यापक ज्ञानेश्वर डांगे, आदींनी सदर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन व तयारी करून घेतली सदर विद्यार्थ्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत असून महाराष्ट्र राज्याचा सन्मान वाढवणाऱ्या या विद्यार्थ्याचे कौतुक आयुक्त श्रीमती नैना गुंडे, उपायुक्त श्रीमती वनिता सोनवणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती दाभाडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर आयुक्त अमरावती जितेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी श्रीमती मेघना कावली, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुरजे सर, शेळके सर, जोशी सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सखारामजी डुकरे, उपाध्यक्ष गोपीनाथ खंदारे व सर्व सदस्य हे सर्व करत आहेत. राष्ट्रीय कला उत्सव 2024 मध्ये पारंपारिक कथाकथन या कला प्रकारात देश पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या या दोन्ही विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.