नांदेड| विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अनेक शाळेत विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यात नांदेड येथील नरहर कुरुंदकर हायस्कूल तर्फे अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.


यात नरहर कुरुंदकर हायस्कूलची इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी कु.श्रावणी सतीश मठपती हिने वार्षिक शाल्येय स्पर्धेत सहभागी होऊन एकूण 7 मेडल पटकावले आहेत. खो-खो मध्ये प्रथम, क्रिकेट मध्ये प्रथम, रनिंग मध्ये प्रथम,थैला रेस प्रथम, नाटक स्पर्धा प्रथम,आनंद नगरी द्वितीय, लिंबू चमचा तृतीय असे एकूण 7 स्पर्धेत आपले स्थान पटकावले आहे. श्रावणी हिने प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादित केल्या मुळे शाळेच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले असून, सर्वस्तरातून श्रावणी हीचे कौतुक होत आहे.




