किनवट, परमेश्वर पेशवे। 31 ऑगस्ट 2024 रोजी किनवटचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी बने सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून सेवा जेष्ठ च्या नियमाला डावलून जिल्हा परिषद प्रशासन घोडेबाजार करून नियुक्ती देण्याच्या विचारात असून सेवा जेष्ठतेच्या नियमानुसारच प्रभारी गटशिक्षणाधिकारी पद, तसेच पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष भरून काढावा अशी मागणी संध्या राठोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
किनवट आदिवासी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बने हे 31 ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहे. अशा स्थितीत किनवट तालुक्यात एकूण आठ शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत असून त्यांच्या सेवा जेष्ठतेच्या यादीनुसार सहाव्या क्रमांकावर असलेल्या विस्तार अधिकारी यांची किनवट गट प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून नियमबाह्य नियुक्ती देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडून तयार करण्याचा मनसुबा आखला आहे. यापूर्वीही याच विस्तार अधिकाऱ्यांची नियमबाह्य प्रभारी गटशिक्षणाधिकारी किनवट येथे नियुक्ती दिली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात किनवट तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला रसातळाला नेण्याचे काम केले होते. तेव्हा अशा लालसी विस्तार अधिकारी यांची सेवा जेष्ठतेच्या नियमाला डावलून नियुक्ती देण्यात येऊ नये निकषानुसारच प्रभारी गटशिक्षणाधिकारी पद भरण्यात यावे.
तसेच पवित्र शिक्षण क्षेत्रात अनेक कर्मचारी यांच्या रिक्त जागा आहे. त्यामुळे जलदगतीने शैक्षणिक प्रगती,विध्यार्थीचा सर्वागीण विकास होणे किनवट, माहूर तालुक्यात कठीण झाले आहे. खेड्यापाड्यात, पोड,तांड्यात शिक्षणाची गंगा पोहोचविणे गरजेचे आहे.एकीकडे भौतिक सुविधांचा अभाव कर्मचारी नांदेड वरुन येणे जाणे शिक्षकावर अंकुश ठेवणारे शिक्षण विस्तार अधिकारी हेच अधुनमधून उगवतात अशा परीस्थिती काय शैक्षणिक विकास होईल.त्यातच काही विस्तार अधिकारी आपल्या सोईनुसार उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी चा अतिरिक्त पदभार घेऊन नांदेड जि.प.मध्ये साहेब बनवून मिरवतांना दिसत आहे.
विस्तार अधिकारी माहूर, विस्तार अधिकारी इस्लापूर व अन्य कर्मचारी यांची लेखी तक्रार उत्तर नांदेड जिल्हा महिला अध्यक्षा संध्याताई प्रफुल्ल राठोड यांनी निवेदनात आजपर्यंत पेसा अंतर्गत काम करण्यासाठी कामचुकार पणा व प्रतिनियुक्ती करणाऱ्या अधिकारी यांच्यासह कार्यवाही करण्याची निवेदनात मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मिनल करणवाल यांच्या कडे आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी संध्या राठोड यांनी लेखी तक्रार केली आहे. या ठिकाणी प्रश्न न सुटल्यास पालक मंत्राकडे तक्रारी करु.या संदर्भात राजकीय आजी माजी आमदार मंडळी फारसे गंभीर नसतात हे देखील शिक्षण प्रेमी जनतेतून दबक्या आवाजात बोलल्या जात आहे.