नांदेड| हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तालुक्यासह जिल्ह्याला परिचित असणारे व मागील अनेक वर्षापासून आष्टीकर घराण्याशी एकनिष्ठ असलेले, शिवसैनिक ओबीसी नेते संजय काईतवाड यांची हिमायतनगर तालुका प्रमुख पदी निवड जाहीर करण्यात आली. याबद्दल गोल्ला गोलेवार यादव समाजाचे प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड यांनी अभिनंदन करत शुभेछा दिल्या आहेत.


गेल्या 22 वर्षांपासून संजय काईतवाड यांनी कट्टर शिवसैनिक म्हणून पक्षाचे एकनिष्ठतेने काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ओबीसी नेते म्हणून संजय काईतवाड यांची हिमायतनगर शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड केली आहे, संजय काईतवाड यांच्यावर निवडी बद्दल हिमायतनगर तालुक्यासह जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती गोल्ला गोलेवार यादव समाजाचे प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड, युवा सेना मराठवाडा सचिव कृष्णा पाटील आष्टीकर, गो. गो. यादव जेष्ठ समाजसेवक बालाजीराव शैनेवाड, नारायणजी वटपलवाड, योगेश पाटील सोनारीकर, अरविंद पाटील, गजानन देवसरकर, संतोष पुलेवार, प्रदेश युवक अध्यक्ष अभिषेक बकेवाड, यांनी उपस्थित होते.


खासदार साहेबानी गोल्ला गोलेवार यादव समाजाचा सन्मान केला – प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड
हिंगोली लोकसभेचे खासदार नागेशजी पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शानाखाली संजय काईतवाड यांनी पक्ष वाढविण्यासाठी 84 हादगांव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक कामे केली. त्यांच्या कार्याची दाखल घेऊन संजय काईतवाड यांना खा.नागेश पाटील आष्टीकर यांनी तालुका प्रमुख पदांची संधी देऊन गोल्ला गोलेवार यादव समाजाचा सन्मान केला. येणारा काळांत संजय काईतवाड यांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभे राहील असे प्रतिपादन प्रदेश अध्यक्ष आक्केमवाड यांनी केले.

