नवीन नांदेड। श्री शनि मंदिर व श्री संकट मोचन हनुमान मंदिर देवस्थान, इंदिरा गांधी गृहनिमार्ण सोसायटी, हडको नांदेड २१वा श्री शनि जन्मोत्सव ६ जुन २०२४ रोज गुरुवार सकाळी ६:३० वा ५१ किलो तेलाचा अभिषेक गुरु शशिकांत महाराज यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाला, यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या सह अजिवन अन्नदाते व भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, यावेळी विश्वस्त समिती यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शनि जयंती निमित्ताने शनि जन्मोत्सव ६ जून २०२४ गुरुवारी सकाळी ६ वाजता सामुदायीक अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी पुजेचे मानकरी श्री शनि जन्मोत्सवाचे अजीवन अन्नदाते हृदय रोग तज्ञ डॉ.कर्मवीर उनग्रतवार यांच्या व उपस्थित अभिषेकाचे यजमान यांच्या हस्ते ५१ किलो तेलाचा अभिषेक करण्यात आला. मुख्य पुजारी शशिकांत महाराज कुलकर्णी गुरू यांच्या हस्ते विधीवत पुजन अभिषेक पूजा,श्री हानुमान चालीसा,श्री शनि चालीसा,आरती करण्यात आली.
यावेळी अजिवन अभिषेक अन्नदाते यांच्या सह नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या विश्वस्त समिती पदाधिकारी यांनी सत्कार केला, मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष करणसिंह ठाकुर (सिडको भुषण), गोपिनाथराव कहाळेकर, कोषाध्यक्ष, माधवराव कदम सेक्रेटरी,संजय जाधव पाटील आर. किशनराव, बाळासाहेब चव्हाण,त्र्यंबकसरोदे,दत्तात्रय सागुरे,शिवाजी आढाव, देवबा कुंचेलीकर,प्रा.अशोक मोरे, निवृत्तीराव जिंकलवाड, किशोर देशमुख,खुशाल कदम ,रघुनाथ चव्हाण,यांनी शनि जन्मोत्सव सोहळा उत्साहात होण्यासाठी परिश्रम घेतले. शनी जयंती निमित्ताने सकाळ पासून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती.