शनि मंदिर देवस्थान येथे शनि जन्मोत्सव सोहळा उत्साहात, महापूजा,अभिषेक व महाप्रसादाचे वाटप -NNL
नवीन नांदेड। श्री शनि मंदिर व श्री संकट मोचन हनुमान मंदिर देवस्थान, इंदिरा गांधी गृहनिमार्ण सोसायटी, हडको नांदेड २१वा श्री शनि जन्मोत्सव ६ जुन २०२४ रोज गुरुवार सकाळी ६:३० वा ५१ किलो तेलाचा अभिषेक गुरु शशिकांत महाराज यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाला, यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या सह अजिवन अन्नदाते व भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, यावेळी विश्वस्त समिती यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शनि जयंती निमित्ताने शनि जन्मोत्सव ६ जून २०२४ गुरुवारी सकाळी ६ वाजता सामुदायीक अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी पुजेचे मानकरी श्री शनि जन्मोत्सवाचे अजीवन अन्नदाते हृदय रोग तज्ञ डॉ.कर्मवीर उनग्रतवार यांच्या व उपस्थित अभिषेकाचे यजमान यांच्या हस्ते ५१ किलो तेलाचा अभिषेक करण्यात आला. मुख्य पुजारी शशिकांत महाराज कुलकर्णी गुरू यांच्या हस्ते विधी...
