हिमायतनगर/नांदेड | पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमेश्वर तुकाराम मादसवार यांचे आजारपणामुळे आज सकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पद्मशाली समाजासह नांदेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. परमेश्वर तुकाराम मादसवार हे समाजातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व असून त्यांनी सामाजिक कार्यातून अनेकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने समाजाने एक अनुभवी व मार्गदर्शक व्यक्ती गमावली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता बोरगडी रोड, वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


स्व. परमेश्वर तुकाराम मादसवार यांच्या पश्चात कुटुंबीय, आप्तेष्ट व मोठा सामाजिक परिवार आहे. ते पद्मशाली समाज संघटनेचे अध्यक्ष संजय परमेश्वर मादसवार यांचे वडील होते.🙏 त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना नांदेड न्यूज लाईव्ह परिवारातर्फे ॐ शांती.


