हिमायतनगर l शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्याल ,हिमायतनगर येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली .


या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . उज्वला के . सदावर्ते या लाभल्या होत्या . त्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यांनीआपल्या मनोगतातून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .या पावन भूमीत अनेक संत झालेत . त्यापैकीच संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे संत आहेत .

संतांनी या पावन भूमीत मानव मुक्तीचा संदेश आणि प्रेमाचा संदेश दिलेला आहे .जोपर्यंत माणसाने एकमेकांविषयी असणारी द्वेष भावना काढून टाकणार नाही ,तोपर्यंत माणसांचा आणि प्रामुख्याने समाजाचा विकास होऊ शकत नाही . हे संत सेवाभायांचे विचार त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले .

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .लक्ष्मण पवार हे लाभले होते . त्यांनी आपल्या मनोगतातून संत सेवालाल महाराजांच्या विचारांवर प्रकाश टाकला आपण ‘काळ्या डोक्याचे माणस आहोत ,कळत नकळत चुका होतात ‘त्या चुका मोठ्या मनाने माफ करून एकमेकांना पदरात घेतले पाहिजे आणि नव्याने जीवन जगले पाहिजे ,कोणाचाही भेदभाव करू नये ;असे विचार मांडले .

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रतिनिधी डॉ . डी .के कदम आणि कार्यालयीन अधीक्षक श्री .संदीप हरसुलकर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ . डी सी . देशमुख यांनी केले तर आभार डॉ . संगपाल इंगळे यांनी मानले .