हदगाव| संजय गांधी निराधार योजनेतील नवीन व ञुटीतील लाभार्थ्याची बैठक तात्काळ घेऊन यादी लावण्यात यावे. अन्यथा 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जिल्हाधिकारी नांदेड समोर अमरण उपोषणाचा इशारा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर पटेल यांनी जिल्हा व स्थानिक प्रशासनाला दिला आहे.


जानेवारी 2024 पासुन ते आज पर्यंत बऱ्याच नवीन व त्रुटीची पूर्तता करून लाभार्थ्याची संगांयोची बैठकीत संचिका घेऊन पात्र अपात्र यादी लावण्यात आली नाही. व तसेच गेल्या एप्रिल महिन्यापासून विधवा महिलांनी संजय गांधी निराधार योजनेतील संचिका सादर केल्याने विधवा महिलांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता आले नाही. व तसेच आज पर्यंत विधवा महिला, दिव्यांनी , वयोवृध्द निराधाराला किमान 20 ते 22 हजार रुपयांचा आर्थिक नुकसान झाली असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.




