उस्माननगर| संपूर्ण राज्यामध्ये १६ जून रोजी पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली . शाळेच्या पहिल्याच दिवशी कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पफुल देऊन तर सेल्फी पाॅईट आणि विद्यार्थ्यांना पुस्तके आणि पेन्सिल चे वाटप करण्यात आले.



प्रदिर्घ उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पाॅईट उभे करण्यात आले होते. हा सेल्फी पाॅईट आकर्षणाचे केंद्र ठरला. सम्राट अशोक प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सोव उत्साहात साजरा करण्यात आला.



या उपक्रमांतर्गत पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत शैक्षणिक साहित्य व पुष्पगुच्छ देऊन औक्षण करून स्वागत करण्यात आले. सकाळी प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या हस्ते शाळा प्रवेशोत्सोव सोहळ्याचे उध्दघाटन फित कापून करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.


यावेळी माजी जि.प. सदस्य प्रतिनिधी माधवराव भिसे , पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण कांबळे , सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे , माणिक भिसे , शाळेतील सहशिक्षक मन्मथ केशे , देविदास डांगे, भगवान राक्षसमारे , शेख शकील , सौ.प्रियदर्शिनी चेनपुरकर (सोनसळे ), श्रीमती समता जोंधळे ,श्रीमती मणिषा भालेराव, सौ.रोहीणी सोनकांबळे, यांच्या सह विद्यार्थी पालक उपस्थित होते.



