नांदेड| हिमालयातील लडाख जवळ असणाऱ्या हॉट स्प्रिंग’ या सोळा हजार फुट उंचावर असणाऱ्या ठिकाणी दिनांक 21 ऑक्टोबर 1959 रोजी केंद्रीय राखीव दलाचे जवान गस्त घालत असतांना अचानक चिनी सैन्याकडुन गोळीबार करण्यात आला. त्यांनी केलेल्या अनपेक्षित हल्ल्याला तोंड देतांना दहा जवान धरातीर्थी पडले. तेव्हा पासुन 21 ऑक्टोबर हा दिन ‘हुतात्मा दिन’ म्हणुन पाळला जातो.
कायदा व सुव्यवस्था राखने, नागरीकांचे जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे ही कर्तव्य बजावत असतांना पोलीस दलातील अनेक अधिकारी व अमंलदार यांना प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती दयावी लागते. अशा प्रकारे विरगती प्राप्त झालेल्या अधिकारी / अमंलदारांना श्रध्दांजली वाहण्यासाठी त्यांचे स्मरणार्थ आज दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी आपण पोलीस स्मृतीदिन पाळत आहोत.
आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा आहे. यावर्षी देखील संपुर्ण भारतातुन 214 पोलीस अधिकारी/अमंलदारांनी आपले कर्तव्य बजावत असतांना आपल्या मातृभुमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिलेली आहे. आपले कर्तव्य बजावताना आजपर्यंत ज्यांना विरगती प्राप्त झाली त्या सर्व हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन मा. श्री शहाजी उमाप, पोलीस उप महानिरीक्षक नांदेड, परिक्षेत्र नांदेड व प्रमुख उपस्थिती म्हणुन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी नांदेड, व अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीमती किरतीका मॅडम, सहा. पोलीस अधिक्षक, उपविभाग नांदेड शहर, सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा नांदेड, डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु), उदय खंडेराय, पोनि स्थागुशा, नांदेड, विजय धोंडगे, रापोनि पो.मु. नांदेड, तसेच शहरातील सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार व प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन पोलीस मुख्यालय नांदेड येथील स्मृती स्मारकास पोलीस अधिकारी व अंमलदारांनी शहीदाना अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण करून, शहींदाना मानवंदना देवुन पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु), यांनी केले आहे.