नांदेड। मराठवाड्याचे भाग्यविधाते ,माजी केद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त १४ जुलै रोजी नांदेड तालुक्यातील धनेगाव (वडगाव) येथील समाधी स्थळी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर, माजी आमदार सौ.अमिताभाभी चव्हाण,सुजया चव्हाण,श्रीजया चव्हाण व चव्हाण परिवार यांच्या वतीने विधीवत पुजन करून अभिवादन केले. यावेळी आमदार,लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या विविध जिल्ह्यातील व नांदेड शहर तालुक्यातुन मोठया संख्येने पदाधिकारी यांनी अभिवादन केले. १४ जुलै रोजी कै. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने समाधी स्थळी जयंती निमित्ताने अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,नांदेड ऊतरचे आ.बालाजी कल्याणकर, भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,देगलूर बिलोली चे आ.जितेंद्र अंतापुरकर, मुखेडचे आमदार तुषार राठोड,माजी आ.सुभाष साबणे,माजी आमदार अविनाश घाटे,चेअरमन गणपतराव तिडके, नरेंद्र चव्हाण,गोविंदराव नागेलीकर, प्वसमतचे माजी नगरअध्यक्ष अब्दुल हाफिज,राचार्य रावसाहेब शैदांरकर,पंढरीनाथ बोकारे (पत्रकार),जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.मंगराणी अंबुलगेकर, माधवराव पटणे,जी नागय्या,सौ.मिनलताई खतगावकर,माजी महापौर मंगला निमकर,विजयाताई शैदांरकर, रेखा चव्हाण, सौ. मंगला धुळेकर, माजी उपमहापौर सरदार सरजीतसिंघ गील,
वैजनाथ जाधव,सतीश देशमुख तरोडेकर,सलाम चावलवाले, बालाजी पांडागळे,संभाजी पाटील भिलवंडे,सुर्यकांत पटणे,अनिता इंगोले,माजी नगरसेविका ललिता शिंदे,माजी नगरसेवक बालाजी जाधव,दिपक पावडे,अशोक मोरे, सौ संगीता भालेराव,यंकटराव पाटील,शामराव पाटील अमराबादकर,उद्धवराव पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,बाळासाहेब देशमुख,अवधूत क्षीरसागर,दिपक पावडे,अविनाश रावळकर, अशोक कदम, भिमराव कल्याणे, माजी कार्यकारी जल अभियंते प्रल्हादराव भालेराव, निळकंठ मदने,भगवान तिडके,अमोल डोंगरे, जयश्री जैस्वाल,वाय नाविद कादरी,माजी नगरसेवक राजु पाटील काळे,कृऊबास संचालक गंगाधर पाटील शिंदे, संजय मोरे, संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड,उदय चव्हाण, विनोद कांचनगिरे, डॉ.नरेश रायेवार,दलित मित्र माधव आंबटवार, दलित मित्र नारायण कौलंबीकर, भि.ना.गायकवाड, घाटे, गिरीधर मैड, डॉ.अशोक कलंत्री,विश्वनाथ शिंदे, अहातखान पठाण यांच्यासह लोक मोठया संख्येने उपस्थित होते. गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव सरदार रवीन्द्रसिंघ बूंगाई यांनी कडा प्रसादाचे आयोजन केले होते. ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.