Rajesh Pawar filed his candidature : हजारो जनसमुदायाच्या साक्षीने शक्ती प्रदर्शन करीत आ.पवार यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल -NNL
नायगांव, सय्यद जाफर| उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आ. राजेश पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. तर याच सभेत आ. पवारांच्या कामाचे कौतुक करुन त्यांना विजयी करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी आ.राजेश पवार यांनी हजारो मतदारांच्या उपस्थितीत हेडगेवार चौकापासून तहसील पर्यंत वाजत गाजत रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत महीला व पुरूषाची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर नांदेड - हैद्राबाद रस्त्यावर असलेल्या देगांव शिवारातील माणिक प्रभु पेट्रोल पंपासमोर जाहीर सभा घेण्य...

