हिमायतनगर (अनिल मादसवार) आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचा विश्वास शिवसेना उपनेते तथा आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच कार्यकर्त्यांनी आजपासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेत सक्रिय कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी बैठकीत केले.
ते म्हणाले, “शिवसेना ही सर्व जाती-धर्मांना समान न्याय देणारी संघटना आहे. हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंदी दिघे साहेब यांच्या विचारांवर चालणारी संघटना असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यमातून नगरविकास खात्याद्वारे हिमायतनगर शहराचा चेहरामोहरा बदलतील. जनतेने देखील आपल्या शहराचा विकास साधण्यासाठी खालपासून वरपर्यंत सत्ता एका हाती दिल्यास गावाचा कायापालट होईल.”
oplus_0
शिवसेनेने आगामी नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक गांभीर्याने घेतली असून, प्रत्येक वार्डात नागरिकांशी संवाद, अडचणींचा आढावा आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यासाठी तयारी सुरू करण्याचे निर्देश आमदार पाटील यांनी दिले. त्यांनी आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांना स्पष्ट सूचना देताना सांगितले की, “वशिला वा शिफारस नको — जनतेत काम करणाऱ्यांचाच बायोडाटा घ्या आणि त्यांची कामगिरी तपासूनच उमेदवारी द्या.”
Oplus_16908288
हिमायतनगर शहरातील श्री साई मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या कार्यकर्ता आढावा बैठकीत शेकडो इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून आपली तयारी दाखवली. शिफारसीला ऊत न देता, कामगिरीच्या आधारे उमेदवारी देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गंगाधर चाभरेकर, महिला जिल्हाप्रमुख शीतल भांगे आदीसह, संभाराव लांडगे मामा, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, विजय वळसे व अन्य मान्यवर, शिवसेना पदाधिकारी, उपस्थित होते.
या बैठकीला मार्गदर्शन करताना हातगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले, “हिमायतनगरची दुरवस्था बदलण्यासाठी नगराध्यक्षासह १७ नगरसेवक शिवसेनेला द्या. पाणीटंचाई, ड्रेनेज आणि बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी आमचे नियोजन तयार आहे. जसा आमदारकीसाठी विश्वास टाकला, तसाच विश्वास आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या भावी नगराध्यक्ष सर्व नगरसेवकांना विश्वास टाकून निवडून द्या, तुम्ही टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.”
oplus_0
ते पुढे म्हणाले, “आत्ताची हिमायतनगर शहराची अवस्था खेड्यापेक्षाही वाईट आहे. नगरपंचायत असलेल्या शहरासारखा विकास कुठेच दिसत नाही. शहराच्या विकासात बदल हवा तर नगरपंचायतीच्या सत्तेत बदल हवा. इच्छुकांची संख्या मोठी आहे, पण मेहनती, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नवीन चेहऱ्यांना आम्ही संधी देणार आहोत.” शिवसेनेच्या या बैठकीनंतर नगरपंचायत निवडणुकीचा रंग चढू लागला असून कार्यकर्त्यांनी जनसंपर्क सुरू करण्याची रणशिंग फुंकण्यात आली आहे. या बैठकीला शहरासह ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती यावेळी कामारिसह ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.