नांदेड| मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्वच आरोपींची माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे . न्यायालयाच्या या निकालाची आम्ही स्वागत करतो . या निकालाने भगवा आतंकवाद निगेटिव्ह नेरेटीव्ह होता हे सिद्ध केले आहे. त्यामुळे काँग्रेस सुशील कुमार शिंदे , दिग्विजय सिंह आणि गांधी घराण्याला हा निर्णय मोठी चपराक असल्याचे मत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.


29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटाचा आज 17 वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल नोंदवला आहे. या निकालात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि अन्य सहा जणांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे . या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्वच आरोपी निर्दोष सोडण्यात आल्याने न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो . तत्कालीन काँग्रेस सरकारने आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे , काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी हा भगवा आतंकवाद असे वातावरण तयार केले होते.

त्यामुळे न्यायालयाच्या आजच्या निकालाने सुशील कुमार शिंदे , दिग्विजय सिंह यांच्यासह गांधी घराणे आणि काँग्रेसला मोठी चपराक लगावली आहे. हिंदू हा आतंकवादी होऊ शकत नाही . हिंदूही विचारधारा आहे . हिंदूही उज्वल जीवनाची , जगण्याची परंपरा आणि संस्कृती आहे . ती संपूर्ण मानवी कल्याणाचा विचार करते अशी प्रतिक्रिया ही खा. डॉ. गोपछडे यांनी दिली आहे.



