श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात ‘ काटे कि ठक्कर ‘ असल्याची लढत पहावयास मिळत असून यातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात फळी आहे.परंतु यातील प्रमुख उमेदवारांचे मतविभाज करण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात मांडी ठोकणारे सचिन नाईक यांच्याकडे माञ कार्यकर्त्यांची फळी नसल्याने व आहेत त्यांची पाहीजे आशी साथ मिळत नसल्याने सचिन नाईकांना किनवट-माहूर मतदार संघाच्या प्रचारात अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे.
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी.आमदार प्रदीप नाईक तर महायुतीकडून भाजपाचे आमदार भिमराव केराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.महायुतीची उमेदवारी जाहिर होण्यापूर्वी सचिन नाईक यांनी महायुतीची तिकीट आमचे भावजी माजी मंञी संजय राठोड यांच्या माध्यमातून मलाच मिळणार असल्याची मतदार संघात चर्चा करीत प्रचार कामाला लागले होते.माञ भाजपाचे आमदार भिमराव केराम यांच्यापुढे सचिन नाईकांची दाळ शिजली नाही.
महायुतीच्या उमेदवारीची माळ केराम यांच्या गळ्यात पडली.सचिन नाईक यांना उमेदवारी न मिळाल्याने अपेक्षीत कार्यकर्त्यांनी मिञ मंडळातून काढता पाय घेत माजी आमदार प्रदिप नाईक व आमदार भिमराव केराम यांच्या सोबत जाणे पसंद केले आहे.सध्या निवडणूक प्रचार मोठ्या तागदीने सुरू असून या निवडणूकीत गावोगावी प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी असणे प्रत्येक उमेदवाराला आवश्यक आहे.
मात्र अपक्ष उमेदवार सचिन नाईक यांच्याकडे सक्षम कार्यकर्त्यांची फळी नसल्याने ते प्रचारात कमी पडत असून माहूर तालुक्यात सचिन नाईक कोण ? असा प्रश्न मतदार संघात निर्माण झाला आहे. राजकिय नेते आपल्या सोयीनुसार पक्ष बदलत असल्यामुळे अपक्ष उमेदवारांवर जनतेचा फारसा विश्वास नसल्याचे चित्र किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात पहावयास मिळत आहे. अशा परिस्थिती मध्ये कोण्या पक्षीय उमेदवारच्या गळ्यात विजयाची माळ पडते याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.