Sachin Naik : कार्यकर्त्यांची फळी नसल्याने सचिन नाईकांना प्रचारात अल्प प्रतिसाद -NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात ' काटे कि ठक्कर ' असल्याची लढत पहावयास मिळत असून यातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात फळी आहे.परंतु यातील प्रमुख उमेदवारांचे मतविभाज करण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात मांडी ठोकणारे सचिन नाईक यांच्याकडे माञ कार्यकर्त्यांची फळी नसल्याने व आहेत त्यांची पाहीजे आशी साथ मिळत नसल्याने सचिन नाईकांना किनवट-माहूर मतदार संघाच्या प्रचारात अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे.
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी.आमदार प्रदीप नाईक तर महायुतीकडून भाजपाचे आमदार भिमराव केराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.महायुतीची उमेदवारी जाहिर होण्यापूर्वी सचिन नाईक यांनी महायुतीची तिकीट आमचे भावजी माजी मंञी संजय राठोड यांच्या माध्यमातून मलाच मिळणार असल्याची मतदार...
