हिमायतनगर,असद मौलाना| हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकाच्या रेल्वेपटरी ते प्लॅटफॉर्म वरून वाहने आणण्यास बंदी असताना काहीजण थेट हिमायतनगर रेल्वेस्थानकावरून पलीकडे दुचाकी घेऊन जात आहेत. यामुळे वाहन चालकांना सूचना देण्यासाठी रेल्वे पोलीस फोर्सच्या जवानाने दिवसभर थांबून जवळपास शेकडो वाहनधारकांना समाज दिला आहे. यानंतर वाहने आणल्यास वाहन जप्त केले जातील अश्या कडक सूचना दिल्या आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर रेल्वे स्थानक हे तेलंगणा – विदर्भाच्या मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून दूरदूरच्या तीर्थस्थळांना जाण्यासाठी नागरिक व प्रवाशी मोठ्या संख्येने येत असते. नुकतेच येथील रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून अंदाजे २३ कोटीच्या निधीतून केले जात आहे. आता हिमायतनगर रेल्वे स्थानक हायटेक होत असल्याने रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर आता सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. तरीदेखील काहीजण शॉर्टकट रस्ता म्हणून शहरात आणि गावाकडे ये – जा करण्याच्या दृष्टीने थेट रेल्वेपटरी ते रेल्वस्टेशनमधील प्लॅटफॉर्मवरून दुचाकीसारखी वाहने घेऊन येत आहेत.

रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून वाहने ने आण करण्यास रेल्वे विभागाच्या नियमानुसार बंदी असताना सर्रास वाहन घेऊन जात आहेत. याबाबत काही जागरूक नागरिकांनी या संदर्भाच्या तक्रारी रेल्वेच्या प्रबंधकाकडे केल्या होत्या. त्यावरून मुदखेड रेल्वे पोलीस अधिकारी गोपीनाथ गोरे यांच्या सुचणावरून रेल्वे पोलीस जवान कैलास कोटुळे यांनी हिमायतनगर येथील रेल्वेपटरी ते प्लॅटफॉर्मवरून वाहने ने -आण करणाऱ्यांची वाहने थांबवून पुन्हा येथून वाहने आणू नये अश्या सूचना देऊन एकप्रकारे शॉर्टकट प्रकाराला जोरदार दणका दिला आहे. काही जणांनी यास विरोध केल्यानंतर त्या वाहनांची छायचित्रे काढून पुन्हा हा मार्ग अवलंबविला गेला तर वाहन जप्ती व दंडात्मक कार्यवाही केली जाईल अश्या कडक सूचना दिल्या आहेत.

याबाबत रेल्वे पोलीस जवान कैलास कोटुळे म्हणाले कि, रेल्वेपटरी ते प्लॅटफॉर्मवरून वाहने ने आण करणे रेल्वे कायद्याने गुन्हा आहे. तसेच येथून ये – जा करणे अपघाताला निमंत्रण देणारे असून, यात कोणतीही अनुचित घटना घडू शकते. त्यामुळे सर्व नागरिकांनी रेल्वे विभागाचा नियमांचे पालन करून स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी. पुन्हा जर वाहने आली तर ती वाहने जप्त केली जातील..? असा कडक इशाराही त्यांनी नांदेड न्यूज लाइव्हच्या माध्यमातून हिमायतनगर शहर व तालुक्यातील त्या वाहनधारकांना दिला आहे.
