नांदेड l 1 ऑगस्ट 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी नांदेड राहुल कर्डिले सर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन तहसील कार्यालय नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच 1 ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.


सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार महसूल सेवक कार्यालयातील सर्व महसूल सहाय्यक ,सहाय्यक महसूल अधिकारी पुरवठा विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सदर कार्यक्रमांमध्ये मा जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते अल्पभूधारक प्रमाणपत्र ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र मिळकत प्रमाणपत्र रेसिडेंट प्रमाणपत्र याचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.


तसेच एकूण 27 बिडी कामगारांना राशन कार्ड चे वितरण करण्यात आले. शासनाच्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा अभियानांतर्गत नांदेड तहसीलचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी तहसीलदार नांदेड श संजय वारकड व उपविभागीय अधिकारी नांदेड डॉक्टर सचिन खल्लाळ यांचे विशेष अभिनंदन केले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत असताना उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लार सर यांनी सामाजिक भान जपत महसुली कामे करावी असे प्रतिपादन केले व जिल्हाधिकारी नांदेड यांनी बदलत्या महसूल विभागाच्या कार्यपद्धती विषयी व अधिकाधिक लोकाभिमुख व कार्यक्षम होण्याविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. महसूल कायदे नियम तसेच आधुनिक तंत्रज्ञान याबाबत प्रत्येक कर्मचाऱ्यांनी अपडेट राहावे असे जिल्हाधिकारी महोदयांनी याप्रसंगी नमूद केले. महसूल दिनानिमित्त माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा संदेश दिला आहे.
दिनांक एक ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या महसूल सप्ताहाचे उद्घाटन सुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्तेया कार्यक्रमात पार पडले.


