नवीन नांदेड l बिएस एफ मधील सेवानिवृत्त हेड कॉन्स्टेबल तथा वसरणी नांदेड येथील रहिवासी राघोजी मोळके यांचे 6 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने हैदराबाद येथे उपचार दरम्यान वीरमरण आले.


त्यांचा द 7 ऑगस्ट रोजी 11 वाजता श्री महर्षी वाल्मिक स्मशानभूमी नावघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बिएस एफ चाकुर येथील कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली. गेल्या सहा महिन्यां पुर्वी जम्मू काश्मीर येथे हेड कॉन्स्टेबल या पदावरून सेवानिवृत्त झाले होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,आई भाऊ बहिण असा परिवार असुन गावातील मुख्य मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.


यावेळी आ.आनंदराव पाटील बोढांरकर यांच्या सह मनपाचे माजी महापौर गंगाधर मोरे, माजी नगरसेवक संजय मोरे,राजु पाटील काळे, राजु गोरे यांच्या सह पोलीस पाटील लवकुश अवनुरे व परिवारातील सदस्य व वसरणी येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमात चाकूर येथून बीएस एफची टीमने मानवंदना दिल्यानंतर करण्यात आला, यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन कर्मचारी उपस्थित होते.




