नांदेड l सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक तथा माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर व महेश देशमुख यांचे वडील श्री पुंडलिकराव बाबाराव देशमुख तरोडेकर शुक्रवारी अनंतात विलीन झाले.


गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांची प्राणज्योत मावळली होती. तरोडा ( बु ) येथे त्यांच्या शेतात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे मोठे चिरंजीव सतीश देशमुख यांनी त्यांना अग्नी दिला. यावेळी आमदार हेमंत पाटील, आ बालाजी कल्याणकर, आ आनंदराव बोंढारकर, माजी मंत्री डॉ माधवराव पाटील किन्हाळकर,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, भाजपा चे अध्यक्ष तथा माजी आमदार अमर राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, कृषी उत्पन्न मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष राजेश पावडे.



कृषी उत्पन्न मार्केट कमिटीचे सभापती संजय देशमुख लहानकर,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धूळगुंडे,खा. रवींद्र चव्हाण यांच्या वतीने त्यांचे काका केशवराव चव्हाण,भाजपा चे माजी अध्यक्ष प्रवीण साले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, प्रा यशपाल भिंगे,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देशमुख, दत्ता कोकाटे, मांजरा साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दत्ता शिंदे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कामाजी पवार,सुभाष पाटील किन्हाळकर यांच्या सह नातेवाईक,मित्र मंडळी, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




