हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी 11 वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जावेद मोहम्मद तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे.


या जाहीर सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे स्टार प्रचारक, लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ही भव्य जाहीर सभा मंगळवारी सकाळी ११ वाजता हिमायतनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित करण्यात आली असून, हिमायतनगर शहर व तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकनाथ पाटील जाधव, हादगाव-हिमायतनगर विधानसभा अध्यक्ष, अभिषेक लुटे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष, वामनराव पाटील वडगावकर हिमायतनगर तालुका अध्यक्ष, अमोल धुमाळे हिमायतनगर शहर अध्यक्ष, शीतल सेवनकर, अभिलाष जयस्वाल आदींनी केले आहे.



