नांदेड | नवरात्रोत्सव काळात राज्यभरात दांडिया व गरबा महोत्सवांचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते. मात्र या पेंडॉल्समध्ये काही विधर्मी प्रवृत्तीचे लोक आपल्या माता-भगिनींवर वाईट नजर ठेवू नयेत, यासाठी आयोजकांनी ठोस उपाययोजना कराव्यात, असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गजानन जोशी यांनी केले.


ते पुढे म्हणाले की, प्रशासन हे सर्व समाजासाठी काम करत असते, मात्र आपणही दक्ष राहणे गरजेचे आहे. “ताई आणि गाईची रक्षा प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे” हे लक्षात ठेवून कार्य केले, तर कोणत्याही ठिकाणी अडचणी निर्माण होणार नाहीत.


महाराष्ट्रातील नवरात्रोत्सव मंडळांनी सुरक्षित व सुसंस्कृत पद्धतीने दांडिया-गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यास कटिबद्ध असावे, असेही ते म्हणाले.




