नांदेड| आगामी नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुका शांततेत, निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.


मतदान दिन – 2 डिसेंबर 2025
मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान सुरू होण्यापासून ते मतदान संपेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या 200 मीटर परिसरात खालील गोष्टींवर बंदी असेल : पक्षकारांचे सर्व प्रकारचे मंडप, दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फेरीवाले, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन, अनावश्यक गर्दी किंवा प्रवेश आदींवर असेल. ही बंदी बिलोली, देगलुर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट व लोहा या नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रांमध्ये लागू राहणार आहे.


मतमोजणी दिन – 3 डिसेंबर 2025
बुधवार, 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीसाठी मुख्यालयी ठिकाणी मतमोजणी केंद्रांच्या 200 मीटर परिसरातही अशाच प्रकारचे प्रतिबंध लागू राहतील. सकाळी 6 वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालील गोष्टींवर बंदी असेल : पक्षांचे मंडप, दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फेरीवाले, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन, अनावश्यक प्रवेश बंदी असेल. ही बंदी बिलोली, देगलुर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा या सर्व नप/नपं निवडणुकांसाठी लागू आहे.




