लोहा| जिल्ह्याचे नेते भाजपाचे माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शुक्रवारी (२५ ऑक्टों) रोजी सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यामूळे जिल्ह्यात राजकिय भूकंप झाला पण हा पक्ष प्रवेश दिल्लीतील शीर्ष भाजप नेत्यांच्या सहमतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारानेच घडवूनआणला. लोहा विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत आणि भाजपा नेतृत्वाना त्यांना दुखवायचे नव्हते त्यामुळेच हा प्रवेश झाला.
ही भाजपाची राजकीय अपरिहार्यता होती, पक्ष तुमचा उमेदवार आमचा ‘हा राजकीय प्रयोग होय भारतीय जनता पक्षाची जशी जिल्ह्यात अपरिहार्यता झाली. तशीच राजकीय कोंडी नेहमीच प्रतापरावांच्या वाट्याला आली. या निवडणुकीत त्यांनी लोकसभा लढविणार नाही मी लोहा विधानसभा लाढविणार असे त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाना प्रत्यक्ष सांगितले होते.जर उमेदवारी द्यायची तर प्राणिताताई याना लोकसभा द्या मी विधानसभा लढतो अशी मागणी त्यांनी केली.,पण पक्ष नेतृत्व विचारविनिमय करत असतानाच स्वपक्षीय चिखलीकर विरोधकांनी त्यांनी” लोहा “मतदार संघावरून राजकीय कोंडी केली.
त्याचे राजकीय भवितव्य डावावर लागणार अशी परिस्थिती निर्माण होत होती पण हिमतबाज प्रतापरावांनी निवडणूक अपक्ष लढणार आणि भाजप महायुती सोडणार नाही असे आपल्या नेत्यास कळविले .त्याच्या सारखा मोठा जनसंपर्क असलेला नेता पक्षाला बाहेर ठेवणे परवडणारे नव्हते त्यामुळेच नांदेड लोकसभा व जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार घोषणा लांबणीवर पडल्या.मतदारसंघात त्यांनी वेगवेगळ्या मॅरेथॉन बैठका सुरू केल्या.महाआघाडीच्या नेत्यांचे सातत्याने फोन येत होते पण त्यांनी काहीच वाच्यता केली नाही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरील श्रद्धा ढळू दिली नाही त्याच्या निर्णयाची वाट पहात राहिले.
विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रकिया सुरू झाली त्यातच दिल्लीत गुरुवारी (२४ ऑक्टोबर ) देशाचे गृहमंत्री अमितशहा यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष खा तटकरे, यासह वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने लोहा मतदार संघ भाजपा कडे सोडण्यास. नकार दिला आणि प्रतापरावांनी लोकसभा निवडणूक पुन्हा न लढविण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. त्याचा सारखा लोक संग्रह असलेला नेता दूर करणे भाजपा नेतृत्वाला मान्य नव्हते त्यातून पक्ष नेतृत्वाने मार्ग काढण्यासाठी दिल्लीत विचारविनिमय सुरू केला.
गुरुवारी सायंकाळी यावर तोडगा काढला. चिखलीकरानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हावर लोहा विधानसभा निवडणूक लढवावी असे ‘उपमुख्यमंत्री फडणवीस इच्छा व्यक्त केली. विचार करून निर्णय कळवा असे त्यांनी सांगितले प्रतापरावांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निर्णय कळविला.उपमुख्यमंत्री श्री फडणवीस मुंबईत सकाळी आठ वाजता तुमचा प्रवेश होईल त्या दृष्टीस तयारीने या निरोप दिला आणि प्रतापरावांनी अचूक वेळ साधत घडयाळ’ बांधले. नांदेड जिल्हयात राजकीय उलथापालथ झाली परंतु त्याला भाजपाचे शिर्ष नेतृत्वाचीच सहमती होती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं घडवून आणले आहे. ही भाजपा पक्षाचीच अपरिहार्यता होती. त्यांनीच हा पक्षप्रवेश घडवून आणला.माजी मुख्यमंत्री राणे याचे चिरंजीव शिवसेनेतून लढत आहेत , तासगाव (सांगली) येथे माजी खा. संजय पाटील यांचाही असाच पक्ष प्रवेश झाला. पक्षाचीच ही ‘पॉलिशी’ ह. त्यामूळे’ जिल्ह्यात यावर राजकीय चर्चा होऊ आहे .महायुतीत तिन्ही पक्षाने “पक्ष आमचा -,उमेदवार तुमचा ” हा राजकीय प्रयोग राबविला आहे.
भाजपात स्थिरावले असे वाटत असतानाच “माजी मुख्यमंत्री “याच्या प्रवेशाने त्यांची राजकीय कोंडी” झाली. पण मन्याड गोदा खोऱ्यातील जनता त्याच्या पाठीशी राहणार (?) हे लवकरच कळेल। पण जिल्ह्यात भाजपा कार्यकर्ते नाराज झाले.पक्ष बदलावावे लागण्याची अपरिहार्यता प्रतापरावांवर येते आव्हाने मोठे आहेत. लढाई सोपी नाही त्यामुळे कार्यकर्त्याना जीवचे रान करू निवडून आणावे लागणार आहे. पंजा,कमळ, धनुष्यबाण आता घड्याळ आता त्यांना विधानसभा निवडणूक चिन्ह प्रवास राहिला आहे.
प्रतापराव आणि ” पक्षांतर ” प्रवास
1992 ते २०२४ काँग्रेस मध्ये कार्यरत .नांदेड जिल्हा सदस्य ,कृषी, शिक्षण, बांधकाम सभापती, जि प उपाध्यक्ष राहिले. कलंबर साखर कारखाना प्राशसकीय चेअरमन, नांदेड जिल्हा बँक संचालक, अध्यक्ष २००४ विधानसभा कंधार अपक्ष म्हणून निवडणूक लढविली व जिंकले.
काँग्रेस सहयोगी सदस्य झाले, पुन्हा २००९ मध्ये लोहा विधानसभा निवडणूक लोकभारती पक्षा कडून लढविली पराभूत), स्व विलासराव देशमुख यांचे ऑगस्ट २०१२ निधन झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला .त्यानंतर शिवसेनेत २०१४ मध्ये प्रवेश केला आणि लोहा विधानसभा निवडणुकीत विजय संपादन २०१७ नांदेड मनपा भाजपा प्रचाराची धुरा.आमदारकीचा राजीनामा देऊन २०१९ मध्ये भाजपा कडून नांदेड लोकसभा तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या विरुद्ध लढविली व विजयी झाले. पुन्हा २०२४ भाजपा उमेदवार ( पराभूत) २५ ऑक्टोबर २०२४ विधानसभा निवडणूकिसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश व उमेदवारी असा राजकीय प्रवास झाला.