Homeक्राईमPolice Raid : नरसीतील दोन लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Police Raid : नरसीतील दोन लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

सात पीडित महिलांची सुटका; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ₹2.04 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड| जिल्ह्यातील नरसी येथील बसस्थानकासमोरील आशीर्वाद लॉज आणि आनंद लॉज येथे सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर नांदेड पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, दहा जणांविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळावरून वेश्यागमनासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण ₹2,04,080 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने आणि बिलोलीचे पोलीस उपअधीक्षक शाम पानेगांवकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) ही कारवाई केली.

पोलिसांना माहिती मिळाली होती की, नरसी येथील आशीर्वाद लॉज व आनंद लॉजमध्ये महिलांना आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी शासकीय पंचांच्या उपस्थितीत दोन सामाजिक कार्यकर्त्यांना बनावट ग्राहक म्हणून लॉजवर पाठविले. व्यवहार निश्चित झाल्यानंतर मिळालेल्या इशाऱ्यावरून पोलिस पथकाने दोन्ही लॉजवर एकाच वेळी छापा टाकला.

या कारवाईत राहुल यशवंत कोलते, विश्वांबर व्यंकटी गाडे, बालाजी आनंदा सूर्यवंशी, खाकीबा शिवाजी सूर्यवंशी, लॉजमालक पांडुरंग शिवराम श्रीरंगिरे, नरसिंग बाबुसिंग ठाकूर ऊर्फ परदेशी, प्रविण दत्तू वारनलवार, कृष्णा बालाजी देशपिठवार, व्यंकट माधव नारे आणि विक्की विनोद इंदूरकर यांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, या कारवाईत नांदेड व पश्चिम बंगाल येथील सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींकडून महिलांना पैशांचे आमिष दाखवून तसेच दबाव टाकून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५३/२०२६ अन्वये अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ मधील कलम ३, ४, ५, ६ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, पोलीस उपअधीक्षक शाम पानेगांवकर यांच्या नेतृत्वाखाली वैभव पडवळ, अतुल भोसले, विक्रम हराळे, साईनाथ पुयड, मिलिंद सोनकांबळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व AHTUच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments