उमरखेड, अरविंद ओझलवार। शासन प्रतिबंधीत असलेला व अवैधरित्या वाहतुक होत असलेला २०,६१,५००/- रुपयाचा गुटखा मुददेमाल वाहनासह पोलीस स्टेशन पोफाळी च्या पथकाने पकडला. या कार्यवाहीमुळे गुटख्याचा गोरखधंदा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधिक्षक डॉ पवन बनसोड यांनी पोस्टे हददीत वाहतुक होत असलेल्या अवैध शासन प्रतिबंधीत गुटखा वाहतुकीवर सक्त कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पोफाळी चे पथकाने गोपनिय माहीती घेत दि. २४ जुन रोजीचे मध्यरात्री ०१.०० वा. एक संशयीत बोलेरो पिकअप वाहन क्र. एम.एच. २६-सी.एच. ०२६४ हे शासन प्रतिबंधीत गुटखा माल अवैधरित्या घेवुन जात असतांना उमरखेड पुसद रोडवर गंगणमाळ फाट्यावर सापळा लावला .
एक पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप वाहन उमरखेड वरुन पुसद च्या दिशेने येतांना दिसली. सदर वाहनास हात दाखवुन थांबविले असता वाहनातील चालक पोलीसांना पाहुन वाहन जागेवरच सोडुन पळुन गेला. पोलीसांनी दोन प्रतिष्ठीत पंच बोलावुन सदर वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर वाहनामधे शासन प्रतिबंधीत केलेला विमल व राजनिवास कंपनीचा मुददेमाल दिसुन आला.
एक महिंद्रा कंपनिची बोलेरो गाडी ज्याचा वाहन क्र.एम.एच.26 सि.एच.0264 ज्याची अंदाजे किंमत 6,00,000/- रुपयेचा मुद्देमाल असा एकुण 20,61,500/- रु चा मुद्देमाल गाडीसह मिळुन आला. सदरचा मुददेमाल ताब्यात घेवुन आरोपी वाहन चालक नामे शेख अयाज शेख वहाब, वय ३५ वर्षे, रा. गढी वार्ड पुसद याचेविरुध्द पोस्टे पोफाळी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा माल कोठुन आणला व त्याचा मुळ मालक कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरची कारवाई पवन बनसोड पोलीस अधिक्षक यवतमाळ, पियुष जगताप , अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मागदर्शनात पोफाळी ठाणेदार पंकज दाभाडे पोलीस उपनिरीक्षक आशिष चिमटे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश बोंबले, पो कॉ सचिन कांबळे ,महिला पोलीस नीलम श्रीवास यांनी केली आहे .