नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर येथील प्रा.साहेबराव दीक्षित यांना पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली. त्यांनी “महाराष्ट्रातील अन्न प्रशासन मराठवाडा विभागाचा एक चिकित्सक अभ्यास” या शीर्षका वर प्राचार्य डॉ.बी.एस.पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रशासन विषयांमध्ये संशोधन कार्य पूर्ण केले.
यावेळी आयोजित मौखिक परीक्षेसाठी प्रा.डॉ.सुधीर दिंडे हे बहिस्थ परीक्षक म्हणून तर सामाजिक शास्त्र विद्या संकुलाचे डाॅ. बोधगिरे हे विद्यापीठ प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून होते. त्याचबरोबर सह मार्गदर्शक म्हणून स्वारातीम विद्यापीठ नांदेड च्या लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख मोहम्मद हनीफ इस्माईल साब हे उपस्थित होते.
डॉ.साहेबराव दीक्षित यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे डॉ. बाळासाहेब भिंगोले, डॉ.बाजीराव वडवळे, डॉ.शरण निलंगेकर,डॉ. सखाराम वाघमारे,डॉ.दीपक वाघमारे,डॉ.दिग्विजय देशमुख डॉ.बाबासाहेब भुक्तरे,प्रा.अशोक आळणे यांच्यासह आप्तस्वकीय आणि मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.