नांदेड l पतंजली योग परिवारातर्फे अवधूत खानसोळे यांच्या वावरात वासरी, पोस्ट आमदुरा, तहसील मुदखेड ठिकाणी 17 आंब्याच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. चार वर्षापासून दरवर्षी दसरी, हापूस, केसर आंबा अमृतवार यांच्या घरी वापरल्यानंतर आंब्याच्या कोईचे रोप निर्माण करून तीन-चार वर्षांपासून संगोपन केलेल्या आंब्याच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. 2018 पासून दरवर्षी दहा झाडे लावणे व ते जगवण्याचा संकल्प यावर्षी खानसोळे यांच्या शेतात 17 आंब्याचे रोप लावून पूर्ण केला.


याप्रसंगी सर्वश्री राम शिवपनोर, महारुद्र माळगे, शिवाजीराव शिंदे हळदेकर, सदाशिव बुटले पाटील, सचिन शिंदे, श्रीकांत पवार, शैलेंद्र नावडे, नारायणराव कुलकर्णी, नामदेवराव मोहिते, दिगंबर पाटील, पंडित पाटील, किरण मूत्तेपवार, अवधूत गिरी, व्यंकट कोटगिरे, निळकंठ जाधव, महानंदा माळगे, प्रतिभा पाटील, मंगला हिंगमिरे, गंगामणी अमृतवार, रुखमाजी धोंडीबा, बालाजीराव भुजबळे, भगवान हळदे, गंगाधर पवार, साहेबराव पाटील, बाबुराव पेंटेवाड, अवधूत खानसोळे आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाची प्रस्तावना अनिल अमृतवार यांनी केली, राम शिवपनर यांनी संघटने विषयी व आगामी योग शिबिराचे नियोजन, सहयोगी योगशिक्षक शिबिर, तसेच हरिद्वार येथे होणाऱ्या मुख्य योग शिक्षक शिबिरा विषयी माहिती दिली, महारुद्र माळगे यांनी संघटनासाठी अर्थ नियोजन गरजेचे आहे असे म्हणाले, शिवाजीराव शिंदे यांनी आभार व्यक्त केले, नंतर अवधूत खानसोळे यांनी आपल्या शेतात महाप्रसाद भोजनाची व्यवस्था केली असे अनिल अमृतसर यांनी सांगितले.




