श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव ते हिवळणी फाट्याच्या मध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या हिवळणी येथील तुलसीराम राठोड यांच्या शेताच्या धु-यावर अज्ञात महिलेला तुराट्या व प-याट्या टाकून जाळल्याची घटना दिनांक ५ जून रोजी रात्री ९.३० वाजता उघडकिस आली आहे.
माहूर पासुन ९ कि,मी, अंतरावर असलेल्या माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील मेन रोड वर असलेल्या आष्टा फाट्याजवळ तुळशीराम राठोड यांच्या शेतात रोड वरुन २०० मिटर अंतरावरा त्याच्या विहिरीजवळ कापसाच्या व तुरीच्या प-याट्या ठेवलेल्या होत्या व जवळच स्पिंकलरची पाईप व नोझल ठेवलेले होते व,तेथे रात्री ९ वा मोठ्या प्रमाणात आग दिसल्याने शेत मालक शेतात आले , व आग विझवण्याचा प्रयत्न केला सर्व आग विझल्यावर अज्ञात महिला जळालेल्या अवस्थेत मुत्तदेह दिसल्याने त्यानी माहूर पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळावर माहूर पोलीस ठाण्याचे सपोनी शिवप्रकाश मुळे यांचे सह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तिच्या हातात बांगड्या आणि पायात जोडवे दिसून आले या व्यतिरिक्त तिची ओळख पटण्यासारखा कुठलाही पुरावा तेथे आढळून आला नाही.
रात्रीच मुत्तदेह शवविच्छेदना करीता माहूर ग्रामीण रुग्णालयात आणन्यात आला, दि ६ जुन रोजी सकाळीच जिल्हा पोलीस अधिक्षक श्री कुष्ण कोकाटे स्थागुशाचे उदय खडेराय यांनी घटनास्थळी भेट देउन पाहणी केली. घटनेच्या तपासाचे कडवे आव्हान माहूर पोलीसांसमोर आहे. या महीलेला जाळून पुरावा नष्ट करण्यामागचा उद्देश्य काय ? सदरील हत्या अनैतिक संबंधातुन तर झाली नसावी ? असे अनेक प्रश्न असल्याने या घटनेच्या तपासात माहूर पोलीसांचा अक्षरशः कस लागणार हे जवळपास निश्चित आहे.